दौंड : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशाने व रिपाई ए दौंड तालुकाध्यक्ष सचिन खरात यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहर व तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( ए)नवीन कार्यकारणी करण्यात आली.
दौंड तालुका अल्पसंख्यांक आघाडीच्या दौंड तालुकाध्यक्षपदी फिरोज तांबोळी यांची निवड करण्यात आली.पुढील कार्यकारणी. दौंड तालुका उपाध्यक्ष रामभाऊ देवडे,दौंड तालुका संघटक अनिकेत सवाने,दौंड तालुका प्रसिद्धी प्रमुख राकेश काळे,विद्यार्थी आघाडीच्या दौंड शहराध्यक्ष अभय भोसले, दौंड शहर युवक संघटकपदी गौतम सोनवणे, दौंड शहर युवक सचिव अजय सावंत,प्रवासी वाहतूक आघाडीच्या दौंड तालुकाध्यक्षपदी संजय अहिरेल्लू, प्रवासी वाहतूक आघाडी दौंड तालुका उपाध्यक्षपदी उज्जलं सुर्वे ,दौंड शहर कार्याध्यक्ष दिगंबर रिकिंबे, दौंड शहर संघटक दिलीप गेजगे,जनरल कामगार युनियन अध्यक्षपदी इंजि आकाश वाघमारे निवडी करण्यात आली.
यावेळी दौंड तालुकाध्यक्ष सचिन खरात म्हणाले कि शोषित पीडित यांना न्याय द्यावा व डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे कार्य करा.
यावेळी दौंड शहर अध्यक्ष शशांक गायकवाड, दौंड तालुका युवक अध्यक्ष पवन थोरात,दौंड शहर युवक अध्यक्ष बाबा कोरे व रिपाई ए चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.