कादंबरीकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम या गीताचे रचनाकार होते इ.स १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहले इ.स१८८२ साली प्रकाशित झाले आणि काही दिवसातच हे गीत स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणागीत झाले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डाॅ.हेडगेवार स्मृती समिती च्या वतीने दौंड मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय गीत वंदे मातरम सामुहिक गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत १२ शाळेच्या ६९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.स्पर्धा योगराज मंगल कार्यालय या ठिकाणी घेण्यात आले होते.वंदे मातरम सामुहिक गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दृतीय क्रमांक मंगेश मेमोरियल स्कूल,तृतीय क्रमांक शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय व उत्तेजनार्थ संत तुकडोजी विद्यालय, ब्लॉसम विद्यालय,
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून बसवराज बिराजदार,अशोक दिक्षित,धनंजय जोशी,संदिप ठेंगाल,दुर्गा शेलार यांनी केले.
कार्यक्रमाचे उदघाटन डाॅ.संगिता जगदाळे पाटील, डॉ.सुमन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजमाता माँसाहेब जिजाऊ,छत्रपती शिवाजीमहाराज, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आप्पासाहेब पवार,राजेंद्र खटी, गुरुमुख नारंग, डॉ.दिपक जाधव,अनिल सोनवणे,रवींद्र जाधव, तानाजी दिवेकर, प्रसाद गायकवाड, अँड अरूणा डहाळे,भुजबळ सर,उपस्थित होते.
वंदे मातरम सामुहिक गायन स्पर्धेचे आयोजन डाॅ.हेडगेवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्ताजी शिणोलीकर,उपाध्यक्ष राजेंद्र थोरात, दिलीप लोकरे,रघुनाथ अंतरकर, जयवंत मोघे,दिलीप पवार, यांनी केले.
सुत्रसंचलन अनंत दंडवते यांनी केले तर आभार प्रदर्शन शाम वाघमारे यांनी केले.