दौंड : नगरपालिकेकडून महिला बचतगटांच्या उत्पादनांस प्रोत्साहन देण्यासाठी महिला बचत गटाच्या वस्तूचे विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते,दौंड नगरपरिषद, महिला बालकल्याण विभाग, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,माझी वसुंधरा अभियान,स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अभियान अंतर्गत दौंड मधील सर्व महिला बचतगटांना मकरसंक्रांतीची भेट म्हणून खाद्य विक्री महोत्सवाचे आयोजन दिनांक १० जानेवारी ते १३ जानेवारी यादरम्यान करण्यात आले होते. दौंड शहरातील नागरिकांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.या महोत्सवात कपडे, स्टेशनरी, भेळ, वडापाव,पाणीपुरी, बिर्याणी,जिगरी पाव, कच्ची दाबेली, बेकरीचे उत्पादने, पुस्तके,गुलाबाची रोपे, पापड,मसाले, कडीपत्ता आणि पालक,वेफर्स,पुरणपोळी,भाकरी,
मंच्युरीअन अशे विविध खाद्य खवैय्या प्रेमीसाठी विक्री साठी उपलब्ध होते
महोत्सवाचे आयोजन दौंड नगरपरिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक म्हस्के यांनी केले.यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यावेळी दौंड मधील सर्व महिला बचत गटांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता.दौंड नगरपालिकेकडून अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन सातत्याने करावे ,अशी इच्छा गोल्डन -२ महिला बचतगट अध्यक्षा सुरैय्याबेगम युसुफ शेख यांनी व्यक्त केली.