दौंड : केंद्रिय आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय भारत सरकारचा उपक्रम आयुष्यमान भारत योजना ही राज्यसरकारने संबंधित योजनेच्या लाभधारक यांची यादी तयार केली आहे या यादीमध्ये अनेक त्रुटी असून, दि. १८ एप्रिल २०२२ रोजी दौंड नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका हद्दीतील रहिवाश्यांची यादी तयार करण्यात आली आहे.आयुष्यमान भारत योजना आर्थिक दुर्बल व्यक्तीसाठी असताना या यादीतील बरीच नावे ही धनदांडग्या श्रीमंत लोकांची आहेत दि. १८ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित झालेली यादी गोळा करण्यासाठी कुठली संस्था काम करत होती व कोणत्या निकषांच्या आधारे काम दिले होते व त्याचा डेटा तपासण्यात यावा तसेच हि यादी रद्द करण्यात यावी व त्या आधारे तयार झालेले आयकार्ड, सर्टीफिकेट रद्द करण्यात यावे अशी मागणी ख्रिश्चन एकता मंचाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष याकोब जंगले यांनी तहसीलदार संजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दौंड नगरपरिषद हद्दीतील २०११ च्या जनगणनेनुसार दौंडची लोकसंख्या ४९ हजार ४५० इतकी आहे.त्यात आयुष्यमान भारत या योजनेत १४ हजार लाभधारक यांची नावं आली आहेत.