राजकीय परिस्थितीनुसार राजकीय,समीकरणं बदलत असतात,वंचित,उपेक्षितांना राजकीय सत्ता प्राप्त करून देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच अशा राजकीय परिवर्तनची नांदी या महाराष्ट्रात आजवर केलेली,घडवलेली आपण पाहिलेली आहे..!
राजकारणात यश,अपयश हा दुय्यम भाग जरी असला तरी राजकारणात परिस्थितीनुसार राजकीय भूमिका घ्याव्या लागतात,राजकीय भूमिका नव्यानं मांडाव्यात लागतात, ते घेत असताना आपल्याला विचारांशी तडजोड न करता..ठामपणे आपली भूमिका उठवून राजकारणात, आघाडी, युतीत समंजसपणा वैचारिक कास धरून योग्य भूमिका घेणारे एकमेव महाराष्ट्रातलं राजकीय नेतृत्व म्हणजेच
आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर..!
काहींना ही शिवसेना, वंचित युती, महाआघाडी रुचली नसेल तर काहींना ती पचली नसेल…पण एक सांगतो राजकारणाच्या बदलाची ही दुसरी व सर्वांत मोठी नांदी असणार आहे, निश्चितपणे या युती,महाआघाडीतून राजकीय गणित,समीकरणं बदलतील नव्हेतर मोठा बदल येणाऱ्या काळात राजकारणात पाहायला मिळेल..!
नेहमीचं ताजतवान राजकारण करण्यावर आदरणीय बाळासाहेबांचा भर असतो..शीळ राजकारण हे भाकरी उलटी पालटी शेकणाऱ्यांना समजते,आदरणीय बाळासाहेब मात्र नवीन शेतात, पिकं पण नव्यानं घेतात..!
त्यांच्या राजकारणात नेहमीच हिरवळ असते सुकलेल्या अन वाळलेले काट्याकुट्यात राजकारण करणारे बाळासाहेब नाहीत अन कधीच नव्हते, नेहमीच नव्यानं नवा विचार करून नव्या दिशेनं वाटचाल करणारे मात्र आपल्या विचारांशी कधीही तडजोड न करणारे एकमेव राजकीय राष्ट्रीय अभ्यासू नेते आहेत..!
राज्यातील प्रस्थापित प्रमुख पक्षांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज आहे, इतर नेते जे स्वतःला आंबेडकरवादी, रिपब्लिकन म्हणून घेतात ते सत्ता जिकडे असते तिकडं जातात, या उलट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मात्र सत्तेपासून वंचित असलेल्या समाजाला राजकीय सत्तेत आणण्यासाठी,बसवण्यासाठी सत्ता संपादन करण्यासाठी आजच्या सारख्या राजकीय भूमिका घेत असतात..!
त्यांनी घेतलेल्या या राजकीय भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत, कारण त्यांनी आपली वैचारीक भूमिका ही जशास तशी ठामपणे ठेवून राजकीय महाआघाडी, युती करून वंचित बहुजन समाजाला नव्यानं सत्तेची दार खुली केली आहेत.!
शेवटी एकच सांगतो… आदरणीय आंबेडकर हे काल पण तुमच्या,आमच्या हितासाठी लढत होते,आजही लढत आहेत,उद्याही लढतील..गरज आहे ती फक्त आपल्या एकतेची, एकीची..!
….✍️मा.पॅथर जयदीप माणिक बगाडे न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य दौंड पुणे.