दौंड – नगरपालिकेत ढिसाळ कामकाज सूरु असून कोणतेही सार्वजनिक कामकाज योग्य रित्या करत नसून ते कामे लोक सहभागातून होत आहे,तरी अशी नगरपालिका ही आशिया खंडात एकमेव असेल की जी महाराष्ट्र शासनाने विकास कामासाठी पैसे पाठवून देखील कुठलेही कामकाज जबाबदारीने व योग्य रितीने करत नाहीत उलट सगळ्या कामात टक्केवारीचा हिशोब लावला जातो यामुळे सामान्य दौंडकर नागरीक त्रस्त आहेत.सर्व कामकाज जर लोक सहभागातून किंवा वर्गणीतून होत असतील तर मग नगरपालिकेची आवश्यकताच काय.?धनदांडग्यांच्या वर नगरपालिका एवढी का मेहरबान.?
रस्ते, पाणी, निवारा,कचरा,गटारीची व्यवस्था,स्वच्छतागृहाची दयनीय आवस्था कुठल्याही प्रकारचा सामान्य जनतेला याचा फायदा होत नसून सामान्य जनता ही नगरपालिकेच्या कामकाजाला कंटाळलेली आहे.तरी शासनाने याची पूर्णपणे चौकशी करावी, महाराष्ट्र शासनाने पाठविलेला निधी हा योग्य प्रकारे वापर होतोय की नाही याची खात्री करावी,तरी ढिसाळ व नियोजन शुन्य कामकाज करणार्या दौंड नगरपालिकेचा दर्जा कमी करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तरी सदर निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आले या निवेदनावर काँग्रेसचे दौंड तालुका महासचिव प्रकाश सोनवणे,दौंड तालुका उपाध्यक्ष पोपट गायकवाड, दौंड शहराध्यक्ष हरेश ओझा,युवक उपाध्यक्ष संकेत क्षीरसागर,शहर सचिव विठ्ठल शिपलकर, निलेश बगाडे,संजय पठारे,हिरालाल साळवे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.