दौंड : तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी फार उपलब्ध नाहीत,उच्च शिक्षणाच्या बाबतीत तर नाहीच नाही,कसेबसे १०/१२ वी झाले की पुढील शिक्षणासाठी पुणे किंवा बारामती शिवाय पर्याय नाही.ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांनी काय करायचे.?दौंड तालुक्यातील कानगांव येथील अशाच एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील एका जिद्दी विद्यार्थ्यांचा सत्कार आम आदमी पार्टी दौंड च्या वतीने करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या MPSC परीक्षेत राज्यात ६६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन वर्ग-१ मुख्याधिकारी ( नगरपालिका) पदावर निवड झालेल्या कानगाव ता.दौंड येथे युवक गणेश संपत चौधरी यांचा कुटुंबीयांसमवेत स्मृतिचिन्ह,शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
साध्या सपराच्या घरात राहणारे शेतकरी कुटूंब, परिस्थीती वर मात करत जिद्दीने अभ्यास केला,या युवकाने परिस्थिती मुळे कुठलाही क्लास न लावता स्वतः अभ्यास करून हे उत्तुंग यश मिळवले.
दौंड तालुक्यातील अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आम आदमी पार्टी नेहमीच कौतुक करते,युवा पिढी सक्षम व सुशिक्षित झालीच पाहिजे असे आप चे दौंड तालुका संयोजक रवींद्र जाधव यांनी शिववृत्त प्राईम न्यूज च्या प्रतिनिधी बोलताना मत व्यक्त केले.
यावेळी विनायक गवळी, महादेव चौधरी शुभम धेंडे उपस्थित होते