दौंड : पुरंदर तालुक्यात पिसर्वे येथील जेष्ठ पत्रकार संदिप बनसोडे यांना गुंडाच्या टोळक्याकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पोलिसांकडून सासवड येथील एका नामचीन गुंडासह त्याच्या इतर साथीदारांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना शुक्रवार (दि.७)रोजी सायं.सव्वा पाचच्या सुमारास पत्रकार संदिप बनसोडे हे आपल्या मामाच्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओने त्यांची गाडी थांबवून त्यांना लाथा बुक्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप फरारी असून,त्यानुसार पोलिसांनी नामाचिन गुंड बापू जाधव यांच्यासह अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी दिला आहे.तसेच अशा गाव गुंडावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा दौंड पोलिस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर यांनी दिला आहे.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.