दौंड – भारतीय पत्रकार संघाची दौंड तालुका नुतन कार्यकारिणी भारतीय पत्रकार संघाचे प्रश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली,पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे यांनी नुकतीच जाहिर केली.यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर,पुणे जिल्हा प्रवक्ते दिनेश पवार,रवींद्र देसाई उपस्थित होते.दौंड तालुका अध्यक्षपदी सुभाष कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पांडूरंग गडेकर,संघटक संदिप बारटक्के,खजिनदार योगेश राऊत,सचिव सुरेश बागल, सहसचिव महेश देशमाने,कार्यध्यक्ष सदाशिव रणदिवे,उपकार्यध्यक्ष विलास कांबळे यांची निवड करण्यात आली.