दौंड विधानसभेचे विद्यमान आमदार ॲड. राहुल कुल हे आज दौंड तालुक्यातील आलेगाव येथे एका नियोजित कार्यक्रमासाठी आले असता दौंड – सिद्धटेक अष्टविनायक मार्गावर एका दुचाकी व चार चाकी वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांचा निदर्शनास आले यावेळी आमदार राहुल कुल यांनी त्यांची गाडी तात्काळ थांबवून अपघातग्रस्त दुचाकी स्वराला त्यांच्या स्वतःचा गाडीतुन तात्काळ ग्रामीण रुग्णालय दौंड येथे हलविले, स्वतः रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णाला अत्यावश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिल्याने पुढील अनर्थ टळला. आमदार राहुल कुल यांनी दाखविलेल्या समय सूचकता व संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांना लोक आरोग्यदूत का म्हणतात याचाच आज पुन्हा प्रत्यय दौंडकरांना आला. प्रशस्त अशा दौंड सिद्धटेक अष्टविनायक मार्गाचे काम झाल्यापासून या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून चार चाकी वाहने सुसाट धावतात यानिमित्ताने रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.