दौंड : दौंड शहरात बहुचर्चित ‘सहयोग एक प्रेमाचा’ मराठी सिनेमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. श्री छत्रपती शिवबा प्रोडक्शन निर्मित रोशन भांबरे दिग्दर्शित दिपक शिंदे व रोशन भांबरे लिखित सहयोग एक प्रेमाचा हा बहुचर्चित मराठी सिनेमाचा मुहूर्त आज दि. 26 मे रोजी दौंड मधील श्रद्धा हॉस्पिटल येथे चित्रीकरण करून सुरुवात करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी श्रद्धा हॉस्पिटलचे संचालक डॉ.राहुल जगदाळे, शिवसेना दौंड तालुका समन्वयक अर्जुन मंडवाले, श्री छत्रपती शिवाजी एक्झिट प्रोडूसर व लेखक दिपक शिंदे दिग्दर्शक रोशन भांबरे प्रोडूसर नामदेव साबळे , कॅमेरामन दत्तात्रय गावडे, आकाश शिंदे ,मेकप आर्टिस्ट मोनाली धोंडगे ,तनुजा वाखारे,कला दिग्दर्शक -दयानंद शिरोलीकर नृत्य कलाकार दौंडचे सुप्रसिद्ध कॉमेडी मॅन चंद्रकांत लोंढे ,जॉन फिलीप,सुभाष गदादे, भगवंत चव्हाण, विलन राजा पाटील, सोनू धुळे, ऋतुजा चव्हाण ,सावनी पीलाने,अभिषेक सवाने, रतन लिंबेकर, संदीप गायकवाड, गायत्री शर्मा , अंकित पिंपळे, उज्वला रोडगे, सुप्रिया धुळे,या चित्रपटांच्या माध्यमातून दौंड मधील स्थानिक कलाकारांना काम करण्याची संधी मिळणार आहे.