दौंड : गणेशोत्सवाच्या पुर्व संध्येला सोमवार (ता.१८) रोजी श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीसांनी शहरातील प्रमुख भागातून रूट मार्च काढला.उपविभागीय पोलीस आधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला.यावेळी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील छ.संभाजी नगर,गोवा गल्ली,नेहरू चौक, कुंभार गल्ली,भाजी मंडई परिसर,गांधी चौक ,खाटीक गल्ली,कुरेशी गल्ली,पानसरे वस्ती,सिध्दार्थ नगर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,हुतात्मा चौक, शालीमार चौक, शहिद भगतसिंग चौक (गोल राऊंड),सरपंच वस्ती,सिध्दिविनायक हॉस्पिटल असा रूट मार्च घेण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तसेच पोलीस ठाण्याचे आधिकारी,कर्मचारी, एसआरपीएफ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस,शहर वाहतूक शाखेचे आधिकारी,कर्मचारी,सर्व सरकारी वाहने सहभागी झाले होते.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मंडळाने शांततेत व आनंदात ध्वनीप्रदूषण न करता गणेशोत्सव साजरा करावा अशा सुचना करण्यात आल्या.