दौंड : दौंड नगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जल प्रदुषण आणि पर्यावरण बाबतीत जनजागृती करण्यासाठी दौंड मध्ये शिशु विकास मंदिर शाळेत मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मुर्ती बनविण्याची एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेसाठी दौंड नगरपालिका तर्फे दिपक म्हस्के,शुभम चौकटे,गणेश ओहोळ यांनी सहकार्य केले.तसेच शिशु विकास मंदिर शाळेचे सचिव कृष्णा गावडे,मुख्याध्यापिका पी.बी.अनंतकवळस, अशोक पानसरे,शिक्षका रेखा पाटील, सुस्मिता पगी,वनिता तांबे,प्रमिला हरीभक्त,वर्षा कुलकर्णी,मनिषा जालम,वृषाली सपकाळ,स्वप्ना मिसाळ यांनी सहकार्य केले.तसेच यावेळी पर्यावरणपूरक श्री गणेश मुर्ती बनविण्याच्या कार्यशाळेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.