दौंड : राष्ट्रीय हरित सेना आणि शेठ जोतिप्रसाद विद्यालयाच्या वतीने शाडू मातीच्या कच्च्या श्रीगणेश मुर्तीना पर्यावरणपूरक रंग देण्याची स्पर्धा नुकतीच भिमथडी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडली.स्पर्धेचे उदघाटन भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भिमथडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल,चेअरमन विक्रम कटारिया,सदस्य भुपेंद्र शहा,शाळेचे प्राचार्य ज्ञानदेव लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे गेल्या १५ वर्षांपासून पर्यावरणपूरक शाडूच्या श्रीगणेश मुर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करत आहे.यामध्ये तयार झालेल्या शाडू मातीच्या श्रीगणेश मुर्तीना रंगविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव व जनजागृती करून विद्यार्थी मन पर्यावरण संवेदनशील व्हावेत या उद्देशाने कार्यशाळा व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.भिमथडी शिक्षण संस्थेच्या शेठ जोतिप्रसाद विद्यालय तसेच श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालयाच्या प्रशालेतील ५१ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या पर्यावरणपूरक श्रीगणेश मुर्ती भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया,उपमुख्याध्यापिका रंजना मस्के,ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब थोरात,पर्यवेक्षक नवनाथ कदम,उपशिक्षक रामदास होले यांच्या हस्ते शाळेतील २१ बालगणेश मंडळांना मोफत वाटप करण्यात आले.राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे म्हणाले की, कै.कि.गु.कटारिया उर्फ बाबुशेठ बोरीकर यांच्या स्मरणार्थ पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.श्रीगणेश मुर्ती रंगविणे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी अथर्व चव्हाण, कुशल बोरा,विराज पवार,ओम दळवी,निरज रेड्डी,प्रसाद बंड,वैभव जगताप,स्वप्नील राऊत, प्रेम मरगर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.झालेल्या स्पर्धेतील ११ सर्वोत्कृष्ट गणेश मुर्ती ठरल्या यामध्ये स्वप्नील बसगोंडे,ओम यादव,श्रेया नांदिरे,समिक्षा वैद्य,शारदा रेड्डी,वीर अहिर,सुप्रिया दसानकर,ज्ञानेश्वरी आवटे,भावना गोलांडे, धनश्री अहिर,सृष्टी वाघमारे.तसेच इयत्ता ४ थी च्या २७ विद्यार्थी तर पाचवीच्या ४४ विद्यार्थी स्पर्धेत सहभाग घेऊन शाडु मातीपासून एकूण ७१ बाल गणेश मुर्ती बनविले.