दौंड : दौंड तालुक्यातील लिंगाळी मसनेरवाडी येथील मस्नोबा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीला शंभर टक्के वसुली करिता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने प्रथम क्रमांक देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सन १९९४ साली स्थापन झालेल्या या संस्थेची जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. नूकतेच संस्थेने दौंड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज असे कार्यालय सुरू केले आहे.आर्थिक वर्ष २२-२३ या वर्षातील शंभर टक्के वसुली करिता पुरस्कार प्राप्त या संस्थेचे ५५१ सभासद असून संस्थेचे ४६,९३,६८३ ईतके भाग भांडवल आहे.संस्थेने ३१/३/२०२३ अखेर १ कोटी ४२ लाख ईतके कर्ज वाटप केले आहे. संस्थेला २२-२३ या आर्थिक वर्षासाठी १,८१,९५४ एवढा नफा झाला आहे. गेली १० वर्षे बँक पातळीवर शंभर टक्के वसुली करण्यात यशस्वी राहिलेली आहे. गेली अनेक वर्षे संस्था सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप करत आहे. आगामी काळात संस्थेची स्वमालकीची जागा घेऊन व्यवसायाकरिता इमारत उभारण्याचा मानस असल्याचे संस्थेचे ज्येष्ठ संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन काशिनाथ जगदाळे यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी श्री निलेश थोरात, कर्ज वाटप अधिकारी रावसाहेब कामठे, संस्थेचे चेअरमन विलास जगताप, लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे लिंगाळीचे माजी उपसरपंच लालासाहेब जगदाळे, संस्थेचे सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.