दौंड : पुणे शहर मराठी अध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा साहित्यिक शिक्षक पुरस्कार दौंड मधील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयाच्या उपशिक्षिका माधुरी काकडे यांना प्रदान करण्यात आला.पुरस्कार सोहळा पुणे शहरातील गंज पेठ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला.साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल माधुरी काकडे यांना हा पुरस्कार कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी विनोदी लेखक सकाळचे उपसंपादक सू. ल खुटवड, मराठी अध्यापक संघाचे संस्थापक हनुमंत कुबडे,लक्ष्मणराव आपटे, प्रशालेच्या प्राचार्य मेघा सिन्नरकर,राज्य परीक्षा परिषदेचे माजी उपायुक्त अनिल गुंजाळ,माय मराठी राज्य अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण महाडिक, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, पुणे जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर, पुणे शहर मराठी अध्यापक संघाच्या अध्यक्षा कल्पना शेरे आदी मान्यवर उपस्थित होते. माधुरी काकडे यांनी मधुसिंधू व मधुदीप हे दोन काव्य प्रकार स्वनिर्मिती केले आहे अल्पावधीतच मधुसिंधू हा काव्यप्रकार लोकप्रिय झाला आहे, त्यांची चार पुस्तके प्रकाशित असून त्यांनी अनेक वृत्तपत्रातून तसेच मासिकांमधून वेगवेगळ्या विषयावर लेखन व काव्यलेखन केले आहे. ‘वाढदिवस’ या पर्यावरणावर आधारित विनोदी मराठी नाटिकेस महाराष्ट्र शासनाचा ‘सृष्टीमित्र’ हा पुरस्कार मिळाला आहे.चारोळ्या,गझल,कथा,कादंबरी, अस्टाक्षरी,हायकू आदी प्रकारच्या लेखन योगदानाबद्दल त्यांना साहित्यिक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.साहित्यिक शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माधुरी काकडे यांचे भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया,चेअरमन विक्रम कटारिया, प्राचार्य ज्ञानदेव लोणकर, उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर, उपमुख्याध्यापिका रंजना मस्के,पर्यवेक्षक प्रमोद काकडे,नवनाथ कदम व सेवक वृंदानी अभिनंदन केले.पुरस्काराबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.