दौंड : दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाल विजय गजानन मंडळाने यावर्षीही वैज्ञानिक माहितीपूर्ण देखावा सादर करून मंडळाने आपली परंपरा कायम ठेवली आहे.यावर्षी मंडळाने ‘इथेनॉल इंधन निर्मिती प्रक्रिया’ हा वैज्ञानिक माहितीपूर्ण देखावा सादर केलेला आहे. इथेनॉल चा वापर वाढल्याने प्रदूषण कमी होऊन निसर्गाची कशी प्रगती होईल, देश कसा प्रगत होईल यांची माहितीपूर्ण देखावा आहे.तरी देशभक्त दौंडकरांनी अवश्य भेट द्यावी.