दौंड : दौंड शहरात कायद्याचा धाक दाखवून दुचाकी वाहनावर तत्परतेने कारवाई करणारे पोलीस शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यावर तेव्हढ्याच तत्परतेने कारवाई करणार का.? असा सवाल दौंड मधील नागरिकांनी केला आहे.पोलीसांनी दुचाकीवर कारवाई चा बडगा उगारला आहे.विना लायसन्स, गाडी व्यवस्थित पार्किंग नाही अशा गाड्यांवर पोलीस दंडात्मक कारवाई करताना दिसत आहे. दौंड शहरात मटका जुगार खेळणाऱ्यांविरूध्द दौंड पोलीस अशीच दंडात्मक कारवाई करेल का असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे जिल्हा संघटक भारत सरोदे यांनी केला आहे. त्यांनी दौंड पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,शहरात मटका,जुगार,दारू,वेश्या व्यवसाय, अवैध वाळू ,अवैध माती जोरदार चालू आहे,तरी कर्तव्यदक्ष पोलीस यांच्यावर कारवाई कधी करणार,असा सवाल आंबेडकरी संघटनेने केला आहे.दौंड शहरातील अवैध धंद्यावर कारवाई झाली नाही तर दौंड पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा आंबेडकरी संघटनेने दिला आहे.दिलेल्या निवेदनावर नागसेन धेंडे, नरेश डाळिंबे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे युवक पुणे जिल्हाध्यक्ष अमित सोनवणे यांच्या सह्या आहेत.