दौंड प्रतिनिधी / उमेश जठार
दौंड : दौंड शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेल्या लिटल जंक्शन स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले,या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ.अरुणा मोरे,भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा प्रवक्ते दिनेश पवार उपस्थित होते,भारतीय सण व सणाचे महत्व ही संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन साजरे केले,या सादरीकरणातून विविधतेतील एकता दाखवण्यात आली,विद्यार्थ्यांनी भाषण,नृत्य यातून उपस्थितांची मने जिंकली,स्कुलच्या प्रिन्सिपल लुबना सय्यद यांनी सांगितले की स्कुल मध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी विज्ञान प्रदर्शन, महत्वपूर्ण दिन,जनरल नॉलेज असे विविध उपक्रम राबविण्यात येतात व विद्यार्थ्यांना प्रत्येक उपक्रमात संधी दिली जाते,या वार्षीक स्नेहसंमेलनासाठी पालक विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आफ्रिन पेवे यांनी केले.