कडेठाण प्रतिनिधी ~ दिपाली दिवेकर
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांच्या स्मृती जागविणारा ३१ वा.राज्यस्तरीय गदिमा काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या काव्य महोत्सवात डाॅ.पांडुरंग बाणखेले यांचे काव्य संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल आले.त्यांच्या काव्याने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.डॉ.पांडुरंग बाणखेले यांच्या काव्याचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल कविवर्य फ.मु. शिंदे, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.”आयुष्यात असे काही क्षण येतात की,त्यामुळे आपलं काळीज फाटतं,पण ते शिवता येत नाही आणि काळीज फाटल्यावर जे शब्द पाझरतात त्यातुनच कविता जन्माला येते”…