पाटस प्रतिनिधी~ योगेश राऊत
पाटस : रविवार (दि.२५) रोजी सिद्धेश्वर मंगल कार्यालय राजगुरुनगर या ठिकाणी अश्वमेघ चषक २०२४ किक बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाली. या किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन निलेश शेलार अध्यक्ष महाराष्ट्र किक बॉक्सिंग यांनी केले. यावेळी कैलास ठाकूर,सतीश राजहंस, रुपेश परदेशी, प्रा. कैलास महानोर,प्रतीक नेवसे,नागेश काळभोर आदि मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेसाठी 540 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अशी माहिती पुणे जिल्हा स्पोर्ट्स किक बॉक्सिंग चे उपाध्यक्ष प्रा. कैलास महानोर यांनी दिली. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
साईप्रसाद अमोल गाडवे ४६ किलो सुवर्णपदक, समीक्षा सुभाष नवले ५९ किलो सुवर्णपदक, पायल शशिकांत पारखी६५ किलो सुवर्णपदक, जित विशाल करनावट २५ किलो रौप्यपदक, साई शशिकांत पारखी २४ किलो कास्यपदक, पृथ्वीराज सुधीर जाधव ३० किलो कास्यपदक, रुद्र रवींद्र लोले २६ किलो कास्यपदक या सर्व किक बॉक्सिंग खेळाडूचे कदम पाटील स्कूलचे चेअरमन लक्ष्मणराव कदम पाटील, प्राचार्य मार्था मिस यांनी अभिनंदन केले .या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन स्वप्निल भागवत सर, सचिन राऊत, तेजस्वी गवते, प्रा कैलास महानोर यांनी केले.