दौंड : दौंड मधील पोदार इंटरनॅशनल स्कुल या प्रशालेमध्ये, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे(डायट)यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण आंतरशालेय तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड प्रशालेची एकांकिकाचा खाजगी प्राथमिक गटात प्रथम क्रमांक आला.सदर एकांकिका ही बालकांच्या भावविश्वाचे दर्शन घडविणाऱ्या “मला तुम्ही हवे आहात ” या विषयावर आधारित होती. आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात हरवत चाललेले प्रेम दर्शवणारी ही एकांकिका इयत्ता चौथी च्या विध्यार्थ्यांनी सादर केली. सदर नाट्य स्पर्धेमध्ये दौंड तालुक्यातून तब्बल बारा शाळांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत उत्कृष्ठ यश संपादन करणाऱ्या शाळा, विद्यार्थी शिक्षक यांचा यावेळी पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड या प्रशाले मध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-५ चे नवनिर्वाचित कामांडंट गणेश बिरादार,पुणे जिल्हा परिषद नाट्य समन्वयक प्रकाश खोत, प्रमोद काकडे, तसेच प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव या मान्यवराच्या हस्ते, सर्व यशस्वी विध्यार्थी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रशालेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी मनोहर होले व विद्यार्थिनी स्वागता प्रदीप वाघ यांना उत्कृष्ठ अभिनयासाठी पारितोषिक मिळाले. तसेच शारवी पवार,अभिज्ञ काळे, दिव्या गांधी,स्वस्ती गाढवे, आराध्या भागवत, हे सर्व विद्यार्थी एकांकिकेमध्ये सहभागी होते.तसेच संजय मोरे यांनी संगीत दिग्दर्शन केले होते.तसेच प्रशालेचे कलाशिक्षक महेश मोरे यांना नाट्य दिग्दर्शनासाठी तालुकास्तरीय उत्कृष्ट दिग्दर्शक हे पारितोषिक मिळाले.यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी कार्यशील राहून कला -क्रीडा व साहित्य क्षेत्रांमध्ये अपार कष्ट व मेहनत करून आपला व आपल्या आई वडिलांचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन केले. तसेच कार्यक्रमास लाभलेले पाहुणे, पुणे जिल्हा नाट्य समन्वययक प्रकाश खोत यांनी अभिनय व नाट्य या विषयावर उपस्थित सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे शिक्षक – हर्षल पोतदार यांनी तर सूत्रसंचालन विवेक पिसाळ यांनी केले.