माहेश्वरी समाज राजस्थानातील कायमच्या नापिकीला कंटाळून हा समाज आपले हुन्नर आजमाविण्यास निघाला.त्यातील अनेक जण महाराष्ट्रात आले आणि येथे रुजले.आषाढी वारीत माहेश्वरी समाजाचीही दिंडी असते.यावरून माहेश्वरी समाज मराठी मातीशी किती एकरूप झाला आहे हे कळून येते. माहेश्वरी समाज..महेश अर्थात शंकर महादेवाच्या कृपादेशाने धर्माचे अनुकरण करीत आपल्या अस्तित्वास आकार देणारा, संख्येत कमी असूनही भारतभर आणि परदेशातही आपली आगळी वेगळी ओळख जपणारा असा हा माहेश्वरी समाज.माहेश्वरी माणसाने समाजोपयोगी संस्थाही उभारल्या. पुण्यात महेश सहकारी बँक, महेश विद्यालय, ताराचंद हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, मारवाडी संमेलन धर्मशाळा (ससून), माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, महेश इंडस्ट्रियल ग्रुप, महेश प्रोफेशनल फोरम, बालमुकुंद संस्कृत व विद्या अध्यासन केंद्र, महेश विद्यालय, महेश सांस्कृतिक भवन इत्यादी संस्थांची नावे आहेत. व्यापार धंदा सांभाळणाऱ्या माहेश्वरी माणसाने संवेदनशील राहत आळंदी, पंढरपूर, तिरुपती, वृंदावन, रामेश्वर, यासारख्या धार्मिक ठिकाणी गो-शाळा, धर्मशाळा, अन्नछत्र, मंदिरे, शुश्रूषा केंद्रे, विद्यालय आदींच्या निर्मितीतही पुढाकार घेतला.पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप माहेश्वरी समाजाच्या वतीने दिली जाते.यावेळी माहेश्वरी प्रगती मंडळाची कार्यकारिणी करण्यात आली.यामध्ये सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मंत्री यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच सचिवपदी मधुसूदन लड्डा यांची निवड करण्यात आली.दौंड मध्ये माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सिध्देश्वर महादेव मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.व नंतर बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद वाटप करण्यात आला.’जय महेश’ जय हो शंकरा,आदि देव शंकरा…च्या नामघोषानी महेश नवमी उत्सवानिमित्त आयोजित शोभायात्रेने दौंडकरांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी बालकलाकारांनी शंकर पार्वती व गणपतीचा जिवंत देखावा सादर केला होता.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात माहेश्वरी समाज सहभागी झाला होता.कपिलेश्वर महादेव मंदिरात १०१ वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात आला.