कडेठाण प्रतिनिधी / दिपाली दिवेकर
कडेठाण : कडेठाण येथील महसूल आकार बंद करा या मागणीसाठी उपसरपंच अनिल धावडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.अखेर उपसरपंच धावडे यांच्या मागणीला यश आले.कडेठाण विभाजन महसूल आकार बंद तयार झाला असून पुढील कार्यवाहीसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण दिवेकर,गुरुदत्त पतसंस्थेचे संचालक जनार्दन कुंजीर, गुरुदत्त पतसंस्थेचे माजी संचालक सचिन धावडे कडेठाण सोसायटी संचालक दादा इंगळे,सचिन लगड,अक्षय दिवेकर,सुमित रणधीर उपस्थित होते.