प्रतिनिधी योगेश राऊत पाटस
बिरोबावाडी (ता.दौंड ) येथील पाटस-दौंड अष्टविनायक माहामार्गावर शालेय विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी पिकअप गाडीने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचे नाव आयुष राजेश यादव (वय ८, सध्या राहणार बिरोबा वाडी तालुका दौंड, जिल्हा पुणे) असे आहे.
ही घटना बिरोबावाडी येथील अष्टविनायक रस्त्यावरील मुख्य चौकात घडली आहे. याच चौकात जिल्हा परिषद शाळा आहे. त्याची आई मुलीला व मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना पाटस वरून दौंड दिशेने वेगात जाणाऱ्या पिकअपने रस्ता क्रॉस करत असताना विद्यार्थ्याला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेचा निषेध म्हणून काही क्षणात ग्रामस्थांनी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात माजी आमदार रमेश थोरात हेही सहभागी झाले होते.
सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल साडेतीन चार तास ग्रामस्थांनी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दौंड तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार तुषार बोरकर, मंडलाधिकारी सुनील गायकवाड, तलाठी संतोष येडुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा करून अष्टविनायक महामार्ग प्रशासनाची चर्चा करून या ठिकाणी संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्लास्टिक गतिरोधक बसविण्यात येतील तसेच चार दिवसात त्या ठिकाणी डांबरीकरणाचा गतिरोधक केले जाईल असे आश्वासन दिले.