दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस दौंड शहरात उत्साहात व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.दौंड मधील स्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे तसेच अन्नदान वाटप करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्रेयस सोनवणे,दौंड शहर अध्यक्ष सचिन गायकवाड, अल्ताफ मुलानी,महिला आघाडी शहर अध्यक्षा मनिषा सोनवणे,काँग्रेस शहर अध्यक्ष हरेष ओझा,मंगेश गायकवाड, दिपक पारदासानी,नवनाथ जगताप, सतपाल सिंग,पंकज नांदखेले, अमित पवार, सोहेल सय्यद, रोहित भिंगारदिवे उपस्थित होते.दिगंबर पवार यांनी मान्यवर लोकांचे स्वागत केले.वैभव शेलार, गिरीष हिप्परगी,संजय बनसोडे तसेच विनोद मराठे यांनी आभार मानले.