दौंड : ‘जग बदल घालूनी घाव,सांगून गेले मला भिमराव’ अशी क्रांतीची घोषणा करणारे थोर समाजसुधारक, साहित्यरत्न,लेखक ,लोककवी,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी १०४ व्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील आण्णाभाऊ साठे नगर मधील लहुजी वस्ताद तालीम संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती तसेच लहुजी यंग ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोहन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.यावेळी लोकशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सन २०२४ ची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी गणेश सदाशिव तूपसौंदर्य यांची तर उपाध्यक्षपदी बाबू भाऊसाहेब खुडे यांची निवड करण्यात आली.तसेच कार्यध्यक्ष शुभम तूपसौंदर्य, उपकार्यध्यक्ष अदित्य तूपसौंदर्य, खजिनदार निखिल ससाणे,सहखजिनदार महेश गायकवाड, सचिव कुणाल तूपसौंदर्य, सहसचिव गणेश ससाणे,गणेश खुडे,सौरभ आगलावे,सनि शेंडगे इत्यादी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी लहुजी यंग ब्रिगेड संस्थापक नितीन तूपसौंदर्य ,राष्ट्रीय खेळाडू विशाल फाजगे,सिध्दार्थ युवक संघाचे अदित्य सोनवणे,आकाश पवार, आकाश तूपसौंदर्य, सनी वाघमारे,महेश कांबळे ,बाळू तूपसौंदर्य, भगत सोनवणे उपस्थित होते.