दौंड : वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी डाॅ.बी.सी.राॅय सेवा रत्न पुरस्कार दौंड चे सुपुत्र डाॅ.राजेंद्र माने यांना प्रदान करण्यात आला.मुंबई येथील नॅशनल कार्पोरेशन फाॅर इन्स्पिरेशन ॲड डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.डॉक्टर दिनाचे औचित्य साधून दौंड मधील डॉक्टर राजेंद्र माने यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी डाॅ.बी.सी राॅय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी खासदार रवींद्र वायकर उपस्थित होते.डाॅक्टर माने यांनी केलेली रुग्णसेवा तसेच आरोग्य सेवेत केलेल्या समर्पणाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.