प्रतिनिधी योगेश राऊत पाटस
जगतगुरु संततुकाराम महाराज यांची पालखी वरवंड येथील गुरुवारचा मुक्काम घेवून भक्तिमय आणि उत्साही वातावरणात रोटी घाट अवघड वाट सर करून शुक्रवार (ता.०५) रोजी उंडवडीच्या (ता. बारामती) दिशेने मार्गस्थ झाली, संध्याकाळच्या पाचच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांची पालखी विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात दौंड तालुक्याचा निरोप घेवून बारामती तालुक्यामध्ये दाखल झाली,
संत तुकाराम महाराज यांच्या देहू ते पंढरपुर प्रवासा मधील पहिला घाट म्हणून रोटी घाटाची ओळख आहे,पाटस पासून काहीच अंतरावर असलेला रोटी घाटामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला पाच बैल जोड्यांच्या सहाय्याने घाट पार केला,रोटी घाटामध्ये रोटीच्या ग्रामस्थां कडून पालखीमधील तुकोबांच्या पादुकांची पूजा आणि आरती करण्यात आली
संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू वरून प्रस्थान करून पंढरपूरच्या दिशेने जात असताना गुरुवार (ता.०४) रोजी वरवंड या ठिकाणी मुक्कामी होता, सकाळी सातच्या सुमारास वरवंडचा निरोप घेवून पालखी पाटसकडे मार्गस्थ झाली, यावेळी हातात भगव्या पताका ,हातात टाळ , मृदंग , कपाळी गंध , संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या नामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि वारकरी मार्गस्थ झाली,
दर वर्षी प्रमाणे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा दुपारचा विसावा आणि भोजन पाटस गावा मध्ये असल्याने सकाळी साडे नाऊच्या सुमारास पालखी पाटसमध्ये दाखल झाली, यावेळी पाटसचे सरपंच तृप्ती भंडलकर, उपसरपंच व इतर मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले, तसेच पाटस मधील हजारो भक्तांनी वारकऱ्यांचे स्वागत केले, यावेळी पालखी पाटसच्या ग्रामदैवत नागेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि विसाव्यासाठी ठेवण्यात आली, दरम्यान पाटस आणि पाटस परिसरातील हजारो ग्रामस्थांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे आणि अश्वाचे (घोडा) दर्शन घेतले,यावेळी पाटसमधील तमाम भक्तांनी ठीक-ठिकाणी वारकरी यांना चहा , पोहे , पाणी बाटली , केळी यांचे मोफत वाटप करुन वारकरी संप्रदाय मधील लोकांची सेवा केली, ,तसेच वरवंड आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली , यावेळी सेवेचा वारकऱ्यांनी मनसोक्त लाभ घेतला , वारकरी यांच्या दुपारच्या विसाव्यामध्ये आपल्या दिंडी ठीक-ठिकाणी विसावा घेत असताना विठ्ठल-रुक्मिणी यांचे भजन,कीर्तनामध्ये मंत्रमुग्ध झाले होते,दुपारचे भोजन आणि विसावा घेवून पालखी आणि सर्व वारकरी रोटीकडे वाटचाल करीत होती,
यावेळी दर वर्षी प्रमाणे पुणे सोलापूर महामार्ग दुपारी एक वाजे पर्यंत बंद करण्यात आला होता , तसेच महाराष्ट्र प्रशासन, पोलिस विभाग आणि होमगार्ड यांनी पालखीचे योग्य प्रकारे नियोजन केले होते , वारकरी यांच्या आरोग्यची तपासणी करण्यासाठी ठीक-ठिकाणी कॉम्प लावण्यात आले होते व वारकऱ्यांची तपासणी व वराकाऱ्यांचे हात-पाय तेल लावून मालिश करुन दिली जात होती. शुक्रवारच्या मुक्कामासाठी बारामती तालुक्यामधील उंडवडीकडे पालखीने प्रस्थान केले,