दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी/ सुरेश बागल
दौंड तालुक्यातील नांदूर – सहजपुर विविध कंपन्यांकडून- विशेषतः फिल्टगार्ड कंपनीकडून स्थानिक नागरिकांवर कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी सातत्याने अन्याय होत आहे.या विरोधात गावच्या काही प्रमुख मागण्या घेऊन योगेश बोराटे,सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे,सोमनाथ बोराटे,राजेश पारवे हे युवक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज उपोषणाचा सहावा दिवस यामध्ये प्रामुख्याने फ्लिट-गार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड. फेनस ऑटो लिमिटेड, पुष्पम फुड्स प्रायव्हेट लिमिटेड, वैष्णवी देवी दूध कंपनी, प्रामुख्याने या कंपन्यातून होणाऱ्या जल प्रदूषण वायू प्रदूषण आणि कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होत आहेत तसेच किमान वेतन कायदा आणि गौण खनिज उत्खनन या नियमांना फाट्यावर मारण्याचे काम या कंपन्यांकडून होत असून याबाबतीतले पुरावे स्थानिकांकडे आहेत तरीही कंपनी प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणाकडे न फिरकल्याने कंपन्याच्या मुजोर कारभारा विषयी जनतेत रोष निर्माण झाल्यामुळे व दोन उपोषण करत्याची प्रकृती डासाळल्यामुळे युवकांनी उपोषणस्थळी जाऊन अर्धनग्न आंदोलन नांदूर-सहजपूर गावातील युवकांनी आज या उपोषणाला ठिकाणी केले तसेच रोष व्यक्त करून घोषणा दिल्या कोण म्हणतो देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय, येळकोट येळकोट जय मल्हार, कामगार एकजुटीचा विजय असो,स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजेत,या कंपन्याच्या मुजोर प्रशासनाचे करायचे काय खाली डोक वर पाय अश्या घोषणा देऊन उपोषण कर्त्याना उत्साहित करण्याचे काम केले तरीपण कंपन्यांकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यास आणि उपोषण कर्त्याच्या जीवितास काय धोका निर्माण झाल्यास त्याची सरस्वी कंपनी व्यवस्थापन व राज्य सरकार जबाबदार राहील अशी संतप्त भावना युवकांनी दिली आहेत आतापर्यंत दौंड पंचायत समितीचे माजी सभापती, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नामदेव ताकवणे यांनी उपोषण स्थळी आतापर्यंत उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. वारंवार तहसीलदार, सर्कल, पोलीस प्रशासनास
या उपोषणा विषयीची सर्व माहिती उपोषण स्थळावरून फोनद्वारे तहसीलदार अरुण शेलार यांना दिली. आणि प्रशासनाने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक नागरिकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी सुचना केली. स्थानिक प्रतिनिधी व सत्ताधारी पक्षाने स्थानिक भूमिपुत्रांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला नाहीत तर येणाऱ्या विधानसभेत आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधींना धडा शिकवू तसेच तिसरा पर्याय निवडून आणू अशी संतप्त भावना युवकांनी व्यक्त केली आहेत. असे उपोषण करत असताना सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे तीव्र शब्दात बोलत होते.
समवेत दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव खराडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे युवक अध्यक्ष सचिन काळभोर,स्वराअंश ग्रुपचे सागर तावरे आणि नांदूर,सहजपूर परिसरातील बेरोजगार तरुण सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.