दौंड – राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास योजनेची घोषणा यावेळी केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. यामध्ये राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत.याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक प्रवीण परदेशी यांच्यावतीने दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अभियानाला दौंड शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाला शनिवार दिनांक ६ जुलै पासून सुरुवात झाली असून ३१ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म विनामूल्य भरून घेतले जात आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरायचा असला तरी याठिकाणी कार्यकर्ते नागरिकांचे ऑफलाइन फॉर्म भरून घेत आहेत व नागरिकांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वोतोपरी मदत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.गरीब, कष्टकरी महिला या अभियानाच्या माध्यमातून वरील योजनेसाठी उपलब्ध करून दिलेल्या फॉर्म भरण्याच्या सुविधेचा लाभ घेत आहेत.सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जाणारे,अडीअडचणीत असणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवणारे सर्वत्र ‘भैय्या’ नावाने प्रसिद्ध असणारे स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रवीण परदेशी यांनी या योजनेचे आयोजन केले आहे व याकामी योगिता जाधव, प्रणाली जगताप, सरिता गौड, शाम सोनोने, वैजनाथ जाधव, मुकेश ठाकवणी,प्रसाद गद्रे यांचे सहकार्य मिळाले.