Author: admin

कडेठाण प्रतिनिधी / दिपाली दिवेकर कडेठाण : कडेठाण येथील महसूल आकार बंद करा या मागणीसाठी उपसरपंच अनिल धावडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.अखेर उपसरपंच धावडे यांच्या मागणीला यश आले.कडेठाण विभाजन महसूल आकार बंद तयार झाला असून पुढील कार्यवाहीसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण दिवेकर,गुरुदत्त पतसंस्थेचे संचालक जनार्दन कुंजीर, गुरुदत्त पतसंस्थेचे माजी संचालक सचिन धावडे कडेठाण सोसायटी संचालक दादा इंगळे,सचिन लगड,अक्षय दिवेकर,सुमित रणधीर उपस्थित होते.

Read More

दौंड : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दौंड मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त १५० झाडे लावून भिम वाॅरियर्सने राजर्षी शाहू महाराजांना आगळी वेगळी मानवंदना दिली.दौंड मधील राजगृह बुद्धविहार,दौंड नगरपालिकेकडून नवीन बांधण्यात येत असलेले बुद्धविहार चा परिसर, लाडली गो-शाळा,लाजवंती भावनदास गॅरेला विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भिम वॉरियर्स चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राणेरजपूत, सचिव सागर उबाळे, भिम शक्ती प्रतिष्ठानचे जितू शिदगने, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे, निलेश मजगर, सोनू घोडके, अमित थोरात, आशिष उबाळे,प्रशांत शिंदे उपस्थित होते.

Read More

दौंड : देशाचे उज्वल भविष्य असलेली आजची युवा पिढी ही अमली पदार्थ सेवनाच्या आहारी जात आहे.मोठ्या प्रमाणात देशातील युवा पिढी अमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चालली आहे.आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी अमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणाम बद्दलची माहिती शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देऊन जनजागृती करण्यात येत आहे.२६ जून म्हणजेच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.तरुणाई मध्ये वाढत चाललेले अमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण हि एक गंभीर व चिंताजनक बाब आहे.असे प्रतिपादन दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी व्यक्त केले.जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी संवाद साधला.अमली पदार्थ सेवनाने तरुण पिढी उध्वस्त होत आहे.चुकीच्या…

Read More

दौंड : ओला, सुका आणि घरगुती घातक कचऱ्याच्या विलगीकरणासाठी दौंड नगरपरिषदेने उपयोगकर्ता शुल्काची अंमलबजावणी सुरु केली आहे.मालमत्ताकराच्या बिलाव्दारे याची वसुली होणार आहे.दौंड नगरपालिकेने सन २०२३-२४ पासून घरपट्टी आकारणी शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.उपयोगकर्ता शुल्क दुकानदारांना ५४० रुपये व घरगुती ३६० रुपये हा वेगळा कर आकारला जात आहे.वाढीव दरवाढीला आम आदमी पार्टीने विरोध केला होता.मात्र,त्यावेळी लोकप्रतिनिधी गप्प राहिले म्हणून दरवाढ रद्द झाली नाही,असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे. भोर,सासवड,पंढरपूर, तळेगाव दाभाडे इत्यादी नगरपालिकेची दरवाढ रद्द झाली.तसेच पुणे,पिंपरी चिंचवड, मुंबई महापालिकेची दरवाढ रद्द झाली. मात्र,दौंड नगरपालिकेकडून वाढीव दरवाढ करण्यात आली.दरवाढ ही पुढील पाच वर्षांसाठी कायम असते.पण आता नव्याने…

Read More

माहेश्वरी समाज राजस्थानातील कायमच्या नापिकीला कंटाळून हा समाज आपले हुन्नर आजमाविण्यास निघाला.त्यातील अनेक जण महाराष्ट्रात आले आणि येथे रुजले.आषाढी वारीत माहेश्वरी समाजाचीही दिंडी असते.यावरून माहेश्वरी समाज मराठी मातीशी किती एकरूप झाला आहे हे कळून येते. माहेश्वरी समाज..महेश अर्थात शंकर महादेवाच्या कृपादेशाने धर्माचे अनुकरण करीत आपल्या अस्तित्वास आकार देणारा, संख्येत कमी असूनही भारतभर आणि परदेशातही आपली आगळी वेगळी ओळख जपणारा असा हा माहेश्वरी समाज.माहेश्वरी माणसाने समाजोपयोगी संस्थाही उभारल्या. पुण्यात महेश सहकारी बँक, महेश विद्यालय, ताराचंद हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, मारवाडी संमेलन धर्मशाळा (ससून), माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, महेश इंडस्ट्रियल ग्रुप, महेश प्रोफेशनल फोरम, बालमुकुंद संस्कृत व विद्या अध्यासन केंद्र, महेश विद्यालय, महेश…

Read More

दौंड : करो योग रहो निरोग हा महामंत्र देत स्व. लाजवंती भावनदास गॅरेला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दौंड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारत स्वाभिमान ट्रस्ट दौंड तालुका प्रभारी व पतंजली परिवाराचे सर्वेसर्वा राजेंद्र ओझा यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र देत योगासनांचे धडे दिले.या बरोबरच शरीरपूरक सूक्ष्म हलचालीही विद्यार्थ्यांकडून करुन घेतल्या.या उपक्रमामध्ये नवयुग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुमुख नारंग,प्राचार्य बाळासाहेब वागसकर,नवयुग प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदिप मांडे, सर्व शिक्षक,शिक्षिका यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षिका कुलकर्णी मॅडम व बैरागी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिकांच्या रुपाने धडे दिले. नवयुग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुमुख नारंग यांनी…

Read More

दौंड : ज्येष्ठ पोर्णिमा निमित्त दत्तपीठ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दत्त गुरूंना दुग्ध महाअभिषेक करण्यात आला.तसेच जागतिक योग दिनानिमित्त दौंड शहरातील योग गुरूंचा दत्तपीठ मंदिराकडून महर्षी पतंजली पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.योगा हा मानवी आरोग्यासाठी जीवन संजीवनी आहे.दौंडकरांच्या आरोग्याची काळजी घेणारे योग गुरु राजू गजधाने,राजेंद्र ओझा,सुनिता कटारिया,अश्विनी गोधरा यांना दत्तपीठ मंदिराच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी दत्तपीठ मंदिराचे प्रमुख विश्वस्त बुवा सावंत, विलास बर्वे, शिवाजी भोसले,सुधीर साने,स्वाती कुलकर्णी, अर्चना साने उपस्थित होते.यानंतर दत्त गुरूची महाआरती करण्यात आली.महाप्रसाद पंगत सुवर्णा संजय जगदाळे यांनी दिली.पौरोहित्य राजहंस गुरुजी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश सावंत, निखील सावंत, मोकाशी काका,संतोष मोतेवार,कुंडलिक चुंबळकर,…

Read More

दौंड : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचे कामकाज २० जानेवारी २०२४ रोजी सुरू करण्यात आले होते.सर्वेक्षणाचे कामकाज सात दिवसाच्या आत पूर्ण करण्याची सक्ती कर्मचाऱ्यांना करण्यात आली होती.मात्र, शासनाने या मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन अद्यापपर्यंत दिलेले नाही.मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका तसेच नगरपरिषद कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कामकाज केलेले आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंत मानधन मिळालेले नाही. त्यातच फक्त अधिकाऱ्यांनाच मानधन मिळाले याबाबतची चर्चा सर्वत्र सुरू आहे.ज्या कर्मचाऱ्यांनी वेळेत काम पूर्ण करून देण्यासाठी वेळेची मर्यादा न पाळता सात दिवस सर्वेक्षण केले, त्या कर्मचाऱ्यांना मानधन मात्र मिळाले नाही.परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक होती त्यांचे मानधन मात्र प्रत्येकाच्या खात्यात जमा…

Read More

दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी/सुरेश बागल दौंड तालुक्यातील” द सायन्शिआ स्कूल ” जिरेगांव हे पंचकोष व मानसशास्त्रीय तत्त्वावर आधारित तसेच आधुनिक व पारंपारिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण देत आहे. या स्कूलमध्ये मुलांना ज्ञान, विज्ञान व संस्काराचे धडे दिले जातात. मुलांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी या स्कूलमध्ये विविध उपक्रम राबिवले जातात, त्याचप्रमाणे द सायन्शिआ स्कूल मध्ये योगादिनाचे औचित्य साधून मुलांनी विविध प्रकारची योगासने सादर केली. मुलांमध्ये शारीरिक विकास तसेच मानसिक व बौद्धिक विकास करण्याकरिता लहानपणापासूनच मुलांना योगासनाचे ज्ञान देत आहेत. योगासनाद्वारे स्कूलमध्ये मुलांची आकलन क्षमता व एकाग्रता वाढविण्याकरता योगासनाचे धडे दिले जात आहेत. तसेच योगा दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये…

Read More

दौंड : दौंड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यां, आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य महिला नेतृत्व आशा रमेश मोहिते यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली.निवडीचे पत्र महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी दिले.

Read More